ध्वनिप्रदुषण रोखण्यासाठी मुंबई वाहतूक पोलीस \'नो हॉर्न डे\' ही संकल्पना घेऊन आले आहेत. \'नो हॉर्न डे\' या संकल्पनेनुसार शहरात आठवड्यातील किमान एक दिवस तरी सबळ कारणाशिवाय हॉर्न वाजवू नये. या संकल्पनेमुळे ध्वनिप्रदुषण कमी होईल, त्यासाठी पोलिसांनी बुधवार हा दिवस निवडला आहे.